पिंपळाच्या हिरव्यागार गर्द सावलीत झाडाखाली बसलो . न कळत गार हवे च्या झोक्यांनी डोळे कसे मिटते कळालेच नाही. साधारणतः दुपारचे दोन वाजले असावेत. गाढ झोपेत नेण्याकरिता ज्या हवेने भाग पडल त्याचं हवेने झाडाची पाने अंगावर पाडून जाग केलं. मी डोळे चोळले आणि डोळे उघडतो तर काय ? सर्व शरीराचे थर्क सुरू झाले , तोंडातून शब्द निघेना झाले , कारण जे समोर होते ते सत्य की असत्य या प्रश्नांनी भारावून सोडलं. काय करावं सूचना ? पळ काढायला पायही तयार होत नव्हते.
तेवढ्यात त्यांनी मला हाक दिली . त्यांनी कोणी तर ? तर जे फक्त माझे तुमचे नाही आपले आहेत आपले बाबा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर .
"घाबरत का आहेस तू मला ? तुझ्या करिता यावं लागलं.."
मी तोडक्यामोडक्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न केला ,
" माझ्यासाठी..का..?"
माझ्या जवळ जवळ येता येता त्यांनी माझ्या प्रश्नांची कोडे सोडविण्याचा प्रयत्न केला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें